Mumbai Crime News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMumbai Crime News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार ABP Majha
राज्यात महिला आणि लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहेत . पालघरच्या जव्हार पोलीस ठाणे हद्दीत एका पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे . भाडेकरू म्हणून राहणाऱ्या एका परप्रांतीय इसमाने घरमालकाच्या पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले असून या विरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सध्या या चिमुकलीची प्रकृती खालवली असून तिच्यावर जव्हारच्या पतंगशहा कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरी कोणी नसताना या नराधमाने या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केले असून या चिमुकलीची आंघोळ घालताना तिच्या आईच्या ही बाब लक्षात आली . चिमुकलीला विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला प्रकार आईला सांगितला असून जव्हार पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनंतर
64 , 65 , 65 (2), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे 4 आणि 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घडलेली घटना चिमुकलीने आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर तिचे आई-वडील आपल्या घरी गेले असता भाडेकरून म्हणून राहत असलेले चारही परप्रांतीय फरार झाले असून सध्या पोलीस त्यांचा शोध घेत आहेत .