Mumbai Crime: मुंबईत प्रेमप्रकरणातून थरार, दोघांचाही मृत्यू Special Report

Continues below advertisement
मुंबईतील काळाचौकी (Kalachowki) परिसरात प्रेम प्रकरणातून (Love Affair) झालेल्या एका धक्कादायक घटनेत सोनू बरई (Sonu Barai) आणि मनीषा यादव (Manisha Yadav) या दोघांचा मृत्यू झाला. दहा वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या सोनूने, मनीषाचे दुसऱ्या कुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तिच्यावर चाकूने हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी मनीषा जवळच्या आस्था नर्सिंग होममध्ये (Aastha Nursing Home) शिरली, मात्र सोनूने तिथेही तिचा पाठलाग करून तिच्यावर वार केले आणि त्यानंतर स्वतःलाही संपवले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. सोनू राणीच्या बागेत (Rani Baug) आचारी म्हणून कामाला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून काळाचौकी पोलीस (Kalachowki Police) अधिक तपास करत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola