Digital Arrest: 'दिल्ली पोलीस आहोत', वर्दीत VIDEO CALL, मुंबईतील वृद्धाला ७५ लाखांना गंडवलं
Continues below advertisement
मुंबईतील (Mumbai) बीडीडी चाळीत (BDD Chawl) राहणाऱ्या एका ६९ वर्षीय निवृत्त व्यक्तीची सायबर गुन्हेगारांनी (Cyber Criminals) फसवणूक केली आहे. दिल्ली पोलीस (Delhi Police) अधिकारी असल्याचे भासवून या सायबर चोरट्यांनी तब्बल ७५.५ लाख रुपये लुटले आहेत. गुन्हेगारांनी पीडित व्यक्तीला सांगितले की, 'तुमच्या बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) खात्याचा वापर २.८३ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात झाला आहे'. यानंतर, पोलीस वर्दीतील एका व्यक्तीने व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून (WhatsApp Video Call) स्वतःचे नाव पोलीस निरीक्षक गोपेश कुमार असे सांगितले आणि जामीन रक्कम भरण्यास सांगितले. या फसवणुकीला बळी पडून, घाबरलेल्या वृद्धाने आपले १८ लाखांचे म्युच्युअल फंड (Mutual Funds) आणि बोरिवलीतील (Borivali) घर विकून ७५.५ लाख रुपये जमा केले आणि चोरट्यांना दिले. अखेरीस फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement