Mumbai : मुंबईचे CP संजय पांडे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीला, काय आहे प्रकरण?
Continues below advertisement
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. राज्य सरकारवर होणाऱ्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जातेय. किरीट सोमय्या-राज्यपाल भेट आणि नवनीत राणांच्या आरोपांबाबत बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. सोमय्या आणि नवनीत राणा यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. राणा आणि सोमय्या यांचे आरोप खोडून काढणारे व्हीडिओ पोलिसांकडे उपलब्ध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. कोठडीत पोलिसांनी छळ केल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. या आरोपांप्रकरणी काही सीसीटीव्ही फुटेज गृहमंत्र्यांना दाखवण्यात आल्याची माहिती मिळतेय.
Continues below advertisement