Corporate Branding: 'धार्मिक स्थळांचं कॉर्पोरेटरायजेशन केलं जातंय'- Varsha Gaikwad
Continues below advertisement
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मेट्रो स्थानकांच्या (Metro Stations) नावांवरून आंदोलन करण्यात आले आहे. 'धार्मिक स्थळांचं कॉर्पोरेटरायजेशन केलं जातंय', असा थेट आक्षेप काँग्रेसने (Congress) घेतला आहे. दादर येथील सिद्धिविनायक मेट्रो स्थानकाला 'ICICI Lombard सिद्धिविनायक' असे नाव दिल्याने काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. केवळ सिद्धिविनायकच नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ स्टेशनच्या नावासमोर 'SBI' चे नाव लावल्याचा आणि नेहरू तारांगण (Nehru Planetarium) जवळील स्टेशनला 'विज्ञान सेंटर' असे नाव देऊन नेहरूंचे नाव वगळल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (Sanjay Gandhi National Park) नावाबाबतही काँग्रेसने आक्षेप नोंदवला आहे. या नामकरणाला काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement