Bachchu Kadu Morcha Speech : हे सरकार लबाडाचा अवतार, लेखी आश्वासनाशिवाय मागे हटणार नाही
Continues below advertisement
शेतकरी नेते बच्चू कडू (Bachchu Kadu), अजित नवले (Ajit Nawale) आणि राजू शेट्टी (Raju Shetti) यांच्या नेतृत्वात हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह नागपुरात (Nagpur) दाखल झाले असून, संपूर्ण कर्जमाफीच्या (Loan Waiver) मागणीसाठी 'महाएल्गार' पुकारला आहे. 'आम्ही तुम्हाले आमचे कर्जमुक्ती मागण्यास तुमच्या घरी येतोय,' असा थेट इशारा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. जोपर्यंत कर्जमाफीचा लेखी निर्णय मिळत नाही, तोपर्यंत नागपूर सोडणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा, पीक विम्याचे ट्रिगर पुन्हा लागू करावे आणि दिव्यांगांच्या मागण्या मान्य कराव्यात, या प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. सायंकाळपर्यंत निर्णय न झाल्यास थेट मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे कूच करण्याची तयारी आंदोलकांनी केली असून, सरकार यावर काय तोडगा काढणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement