Mumbai : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं विटंबन,सलग दुसऱ्या दिवशी पडसाद: Abp Majha

कर्नाटकातील बंगळुरुमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे सलग दुसऱ्या दिवशी पडसाद उमटतायत. या घटनेचा निषेध करण्यासाठी मुंबईत शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळी शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. तर दुसरीकडे लालबाग परिसरातही शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. यावेळी कर्नाटक सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसंच पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे असं विधान करणाऱ्या कर्नाटकाचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola