Mumbai Central Local News : मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने;प्रवाशांचा खोळंबा

Continues below advertisement

Mumbai Central Local News : मध्य रेल्वेची वाहतूक अर्धा तास उशिराने;प्रवाशांचा खोळंबा

त्रुटी दूर केल्याने मध्य रेल्वे वर लोकल सुरळीत चालतील असे मध्य रेल्वे ने सांगितले असले तरी अजून ही मध्य रेल्वे वर अर्धा तासापर्यंत लोकल उशिराने धावत असल्याचे पाहायला मिळते आहे. हजारो प्रवासी मध्य रेल्वे ने दिवस भर प्रवास करीत असतात, प्रत्येक वेळी रेल्वे मेगा ब्लॉक घेऊन यंत्रणा सुधारण्याचा प्रयत्न करते परंतु लोकल च्या परफेक्ट वेळा काही मध्य रेल्वे ला सादता येत नाहीये, यामुळे प्रवासी देखील संताप व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.मुलुंड रेल्वे स्थानकातून मध्य रेल्वे चा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी….

ही बातमी पण वाचा

Maharashtra MLA List June 2024 मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024) तीन ते चार महिन्यावर येऊन ठेपली आहे. महाराष्ट्रातील मागील विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. त्यामुळे नवी विधानसभा त्यापूर्वीच अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. येत्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) होऊ शकतात. महाराष्ट्र विधानसभेत 288 आमदार (Maharashtra 288 MLA list) निवडले जातात. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्यावेळी भाजप आणि शिवसेना युती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी एकसंघ शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती.  भाजप-शिवसेना युतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी लढली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस 54 जागांसह तिसऱ्या, काँग्रेस 44 आमदारांसह चौथ्या स्थानावर होती. 

महाराष्ट्र विधानसभा निकाल 2019, पक्षीय बलाबल (Maharashtra Assembly Election result 2019 Party wise result)

  • भाजप – 105 
  • शिवसेना – 56 
  • राष्ट्रवादी – 54 
  • काँग्रेस – 44
  • बहुजन विकास आघाडी – 03
  • प्रहार जनशक्ती – 02
  • एमआयएम – 02
  • समाजवादी पक्ष – 02
  • मनसे – 01
  • माकप – 01
  • जनसुराज्य शक्ती – 01
  • क्रांतिकारी शेतकरी पक्ष – 01
  • शेकाप – 01
  • रासप – 01
  • स्वाभिमानी – 01
  • अपक्ष – 13
  • एकूण – 288 

(Maharashtra Vidhansabha MLA List 2019)

महायुती – 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी – 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram