Mumbai Building Collapse: माहीममध्ये पाडकाम सुरु असलेली इमारत कोसळली, २ जण जखमी, अनेक गाड्यांचे नुकसान

Continues below advertisement
मुंबईतील माहीम (Mahim) परिसरात सेनापती बापट मार्गावर (Senapati Bapat Marg) एका चार मजली इमारतीचे पाडकाम सुरु असताना ती कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत शाहरुख खान (२४) आणि मोहम्मद अयुब (२४) हे दोघे जखमी झाले असून त्यांना जवळच्या रहेजा रुग्णालयात (Raheja Hospital) दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दुपारी १:४८ च्या सुमारास उन्नती सोसायटीमधील (Unnati Society) जुन्या 'जॉन्सन अँड जॉन्सन' इमारतीचे (Johnson & Johnson Building) पाडकाम सुरू असताना ही घटना घडली. इमारतीचा ढिगारा बाजूच्या अमोल अपार्टमेंटच्या (Amol Apartments) आवारात उभ्या असलेल्या गाड्यांवर आणि एका JCB मशीनवर कोसळला, ज्यामुळे वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई पोलीस आणि BMC चे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरू केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola