Ameet Satam BJP Mumbai : अमित साटम भाजप मुंबईचे नवे अध्यक्ष, पहिला वार ठाकरे बंधुंवर
भाजपने काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाबाबत अधिकृत घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक घेत महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून आमदार अमित साटम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली. अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळेला फडणवीसांनी आशिष शेलार यांनी मुंबई विभागाचं अध्यक्षपद समर्थपणे याआधी सांभाळलंय असेही म्हटले. या निवडीमुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीला वेग येणार असून, मुंबईतील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.