Mumbai Bank Scam : Prasad Lad - Pravin Darekar यांच्याविरोधात आम आदमी पार्टीनं आक्रमक, कारवाईची मागणी
Continues below advertisement
मुंबै बँकेचे संचालक असलेले भाजपचे नेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्याविरोधात आम आदमी पार्टीनं आक्रमक भूमिका घेतलीय. बँकेत दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी केलाय. प्रसाद लाड कर्मचारी नसतानाही कर्मचारी म्हणून बँकेवर निवडून येतात, असा आरोपही शिंदे यांनी केलाय. दरेकर आणि लाड यांनी सहकारी संस्था नियमांचं उल्लंघन केल्यानं त्यांना अपात्र घोषित करून कारवाई करावी अशी मागणी शिंदे यांनी केलीय. लाड यांच्या कंपनीला कमी व्याजदरानं कर्ज देण्यात आलं असा आरोपही त्यांनी केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी.
Continues below advertisement