State Bank | पोलिस विभागाची दोन लाख खाती स्टेट बँकेत वळवणार? | ABP Majha
फडणवीस सरकारचा एक मोठा निर्णय ठाकरे सरकार बदलण्याच्या तयारीत आहे...कारण पोलिस विभागाची जवळपास दोन लाख पगार खाती आता राष्ट्रीयकृत बँकेक़डे वळवली जाण्याची शक्यता आहे..सरकारी पातळीवर याबाबतच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती मुंबई मिरर या वृत्तपत्रानं दिलीय..फडणवीस सरकारच्या काळात यातली बहुतांश वेतन खाती स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अँक्सिस बँकेकडे हस्तांतरित करण्यात आली होती..तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या अँक्सिस बँकेत कार्यरत असल्याचा संबंध याच्याशी जोडला जात होता..त्यामुळं नव्या सरकारमध्ये यात बदल होण्याची शक्यता आहे..महिनाअखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर यासंबंधीचा निर्णय होण्याची शक्यता आहे