Maharashtra Cabinet | कर्जमाफी, शिवभोजनला मंत्रिमंडळाची मंजुरी | ABP Majha

Continues below advertisement
राज्य मंत्रिमंडळांनी देखील दोन महत्त्वाच्या योजनांना मंजुरी दिलीय. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घोषित केलेल्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिलीय. यात सुमारे ३९ लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलंय.  यात प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 29 हजार 800 कोटीचा भार सरकारवर पडणार आहे. तसंच शिवभोजन योजनेला देखील मंजुरी मिळाल्यानं आता सर्व जिल्ह्यात 10 रुपयांत गरिबांना जेवणाची थाळी मिळणार आहे. काल उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत   कर्जमाफीची पद्धत आणि शिवभोजन योजनेसंदर्भातली नियमावली अंतिम करण्यात आलीय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram