Mumbai- Ahmedabad Highway: महामार्गावर अपघात, चौघांचा मृत्यू, सहा जखमी, दोघे गंभीर
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आवंढाणी गावच्या हद्दीत कारचा भीषण अपघात झाला. या अपघात चौघांचा मृत्यू झाला तर सहाजण जखमी झालेत. त्यातील दोघे गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. एकवीरा मातेचं दर्शन घेऊन पालघर तालुक्यातील बोईसर दांडी येथे परतणाऱ्या कुटुंबावर काळानं घाला घातला. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघातातील जखमींना उपचारासाठी मनोर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले