Iqbal Musa Rally in Amol Kirtikar: 1993 च्या बॉम्बस्फोटाचा आरोपी इक्बाल मुसा कीर्तिकरांच्या प्रचारात

Continues below advertisement

Amol Kirtikar Rally : मुंबई : 1993 च्या बॉम्बस्फोटचा (1993 Bomb Blast) आरोपी इकबाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील (Mumbai North West Seat) महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांच्या प्रचारार्थ आणि समर्थनार्थ फिरताना दिसत आहे, असा आरोप भाजपनं केला आहे. मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं समर्थन महाविकास आघाडीचे उमेदवार घेताना दिसत आहे. त्यामुळे ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे गँगचा लढा आहेच, परंतु ही लढाई भारत आणि पाकिस्तानची लढाई झालेली आहे, असंही भाजपनं म्हटलं आहे. 

मुसा उर्फ बाबा चव्हाण हा उत्तर पश्चिमच्या महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्या प्रचार रॅलीत दिसून आला. या प्रचार रॅलीचा व्हिडीओ भाजपच्या हाती लागला असून भाजपनं या व्हिडीओवरुन थेट उद्धव ठाकरेंना थेट प्रश्न विचारला आहे. तसेच, त्यांचं असं म्हणणं आहे की, उद्धव ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की, ते नेमके कोणासोबत आहेत? ते मुंबईकरांसोबत आहेत की, 1993 वेळी ज्यांनी मुंबईकरांना त्रास दिला त्यांच्यासोबत आहे? असे प्रश्न भाजपच्या वतीनं ठाकरेंना विचारण्यात आले आहेत. त्यासोबतच 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर बाळासाहेब खूपच संतापलेले होते आणि त्यांनी अत्यंत परखड भूमिका घेतली होती. पण तुम्ही आता 1993 च्या आरोपींनाच सोबत घेतलंय. तुम्हाला मुंबईकरांना नेमकं काय द्यायचंय? असा प्रश्नही भाजपनं विचारला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram