Shirdi Market | शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद मागे, साईनगरी पूर्वपदावर | ABP Majha
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विनंतीनंतर शिर्डीकरांनी पुकारलेला बेमुदत बंद तात्पुरता स्थगित करण्यात आलाय. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली आहे. फक्त शिर्डीचं शिष्टमंडळ या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळतीय. पाथरीकरांना या बैठकीसाठी निमंत्रण नाही....शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे आणि शिर्डीतील प्रतिष्ठित नागरिक मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील. या चर्चेत तोडगा निघाला नाही तर पुन्हा बंद पुकारण्याचा इशाराही शिर्डीकरांनी दिलाय. त्यामुळं समस्त साईभक्तांचं लक्ष आज होणाऱ्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीकडे लागलं आहे.