MSRTC Ticket Cost : एसटीच्या तिकीट दरात भाडेवाढ, काय असणार आहेत नवे दर? जाणून घ्या
आजपासून एसटीच्या भाड्यात किमान 5 रूपयांची वाढ करण्यात आली आहे. काल एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत तिकीट दर वाढीचा निर्णय झाला असून एसटी महामंडळाने 17.17 टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. प्रति किलोमीटर 21 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे तर पूर्वी प्रतिकिलोमीटर 1 रुपया 24 पैसे दर होते ते आता प्रतिकिलोमीटर 1 रुपया 45 पैसे झाले आहेत. या बैठकीत तिकीट दरात 17.17 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आली आहे.