Health Department : आरोग्य विभागाच्या परीक्षांचा गोंधळ कायम, मुंबई आणि भंडाऱ्यात पेपर फुटल्याचा आरोप
Continues below advertisement
आरोग्य विभागाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप करण्यात येत आहे. परीक्षेआधी एक तास पेपर फुटल्याचा आरोप काही विद्यार्थी आणि एमपीएससी समन्वय समितीनं केला आहे. पेपर सुरु होण्याआधीच पेपरची उत्तरे बाहेर आल्याचं एमपीएससी समन्वय समितीचं म्हणणं आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार आहे तर दुसरीकडे आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यान भंडारा जिल्ह्यातल्या तुमसरमध्येही गोंधळ उडाला होता. परीक्षेची वेळ 2 ते 4 होती, मात्र परीक्षा अडीच वाजताच सुरु झाल्याचे समोर आले. प्रवेशपत्रातल्या गोंधळामुळं अनेक विद्यार्थ्यांनाही परीक्षेपासून वंचित राहावं लागलं. प्रवेशपत्रावर संबंधित परीक्षा केंद्राचा पत्ता असतानासुद्धा विद्यार्थ्यांचे नंबर त्या परीक्षा केंद्रावर नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Mpsc MPSC Exam Health Department Exam Health Exam Health Exam MPSC MPSC Paper Leak Health Exam Paper Leak