MPSC Hall Ticket Link Leak : एमपीएससीचे हॉल तिकीट लिंक लीक झाल्याची माहिती, नेमकं प्रकरण काय?
Continues below advertisement
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 30 एप्रिलला होणाऱ्या गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षेच्या हॉल तिकीटची लिंक सोशल मीडियामध्ये व्हायरल झालीये... या लिंकमध्ये 90 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट समोर आल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र हॉल तिकीट दिल्यानंतर सुद्धा एकाच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पाहायला मिळत असल्याने डेटा सेक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे. दरम्यान एबीपी माझाच्या बातमीनंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दखल घेण्यात आली आहे. शिवाय या लिंक संदर्भात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एमपीएससीकडून मिळाली आहे.
Continues below advertisement