MPSC Postponed : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 2 जानेवारी रोजी होणारी पूर्वपरीक्षा लांबणीवर
abp majha web team
Updated at:
30 Dec 2021 11:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 2 जानेवारी रोजी होणारी पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसा निर्णय आयोगाकडून काल जाहीर करण्यात आला आहे. महत्वाची बाब म्हणजे या निर्णयावेळी ही परीक्षा पुढे कधी घेतली जाणार, याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे परीक्षार्थींकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसंच काही जणांकडून आयोगावर टीकाही केली जातेय. या पार्श्वभूमीवर आयोगाने एक पत्रक काढून कारवाईचा इशारा दिलाय.