Maharashtra :महाराष्ट्रातील निवासी डाॅक्टरांनी अखेरीस संप मागे घेतलाय : ABP Majha
महाराष्ट्रातील निवासी डाॅक्टरांनी अखेरीस संप मागे घेतलाय. काल निवासी डाॅक्टरांसोबत वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालकांसोबत डॉक्टरांची बैठक झाली. त्या बैठकीत मागण्यांवर तोडगा निघाला आहे. नीट पीजी काऊन्सिलिंग प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत कंत्राटी पद्धतीनं निवासी डाॅक्टरांची नियुक्ती होणार असल्याचं संचालकांनी सांगितलंय. तसंच निवासी डाॅक्टरांना लवकरच कोव्हिड भत्ता मिळणार, स्टायपेंड वेळेवर मिळण्यासंदर्भातही लवकरच निर्णय होण्याचं आश्वासन निवासी डॉक्टर्सना देण्यात आलंय.
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Doctor Resident Doctors Strike ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Pg