Pune - Kolhapur Highway : पुणे-कोल्हापूर महामार्गाची चाळण,एबीपी माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग
Continues below advertisement
पुणे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीच्या कामामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे आणि वाहतुकीच्या समस्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना ट्वीट करून लक्ष घालण्याची विनंती केली आहे, या वृत्तामुळे या विषयाला राजकीय वळण मिळाले आहे. पुणे ते कोल्हापूरमधील कागलपर्यंत महामार्गावर खड्डे आणि बाह्यवळणांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याच्या 'एबीपी माझा'च्या वृत्तानंतर सुप्रिया सुळे यांनी हे पाऊल उचलले. या प्रवासमार्गावर दुरुस्तीच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement