कोपर्डीचा खटला अजूनही प्रलंबित, सरकारने उच्च न्यायालयात तातडीने अर्ज करावा : संभाजीराजे छत्रपती
पुणे : कोपर्डी घटनेतील दोषींना अजूनही शिक्षा का झाली नाही असा प्रश्न खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपस्थित केला आहे. स्पेशल बेंचच्या माध्यमातून या प्रकरणात सहा महिन्यात निकाल द्यावा, अशी मागणी उच्च न्यायालयाकडे राज्य सरकारने करावी असंही ते म्हणाले.