मंत्री अनिल परबांचं रिसॉर्ट बेकायदेशीर? सोमय्यांच्या तक्रारीनंतर पर्यावरण केंद्रीय पथकाकडून पाहणी
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मुरुड समुद्र किनाऱ्यावर बांधण्यात आलेलं साई रिसॉर्ट वादाच्या भोवऱ्यात सापडले असून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब यांनी हे रिसॉर्ट बेकायदेशीरपणे बांधले असल्याची तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिल्यानंतर अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार असे बोलले जात आहे.आणि याच वादग्रस्त साई रिसॉर्ट ची पाहणी आज केंद्रीय पथकाकडून करण्यात आली.हे पथक केंद्राच्या पर्यावरण विभागाकडे अहवाल सादर करणार आहे त्यानंतर या साई रिसॉर्टचे भवितव्य ठरणार असून सध्यातरी भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी सरकार यांच्यामधला कलगीतुरा या रिसॉर्टच्या वादातून पाहायला मिळत आहे.