Marataha Aarkashan : मराठा आरक्षण प्रश्नावरून खासदार संभाजीराजे यांचं आजपासून मुंबईत आमरण उपोषण
मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत आजपासून आमरण उपोषण सुरु करण्याचा पवित्रा घेतलाय. मुंबईतील आझाद मैदानात ते उपोषण सुरू करणार आहेत. मराठा आरक्षणाचा लढा न्यायालयात दीर्घ काळ चालेल, पण सारथी संस्थेचं सबलीकरण करण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याची मागणी संभाजीराजे यांनी केलीय. आजपासून सुरु होणाऱ्या आंदोलनाचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आधीच पाठवलं होतं. संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत येणार आहेत.