ठाकरेंचा भाजप आणि फडणवीसांवर निशाणा, आम्ही काय फक्त धुणीभांडी करायची का? :Uddhav Thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. लोकसत्ता’च्या ७४व्या वर्धापन दिनानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायांवरुन भाजपला इशारा दिला. आता तुमची वेळ आहे, घाला धाडी, प्रत्येकाचा दिवस असतो... लक्षात ठेवा या शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी भाजपला ठणकावलं. तसंच मी पुन्हा येणार या घोषणेवरुनही मुख्यमंत्र्य़ांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावलाय..