Bhau Beej Politics: 'ताईंनीच मला खासदार केलं', खासदार Balwant Wankhede यांनी Yashomati Thakur यांचे मानले आभार

Continues below advertisement
अमरावतीमध्ये (Amravati) काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) आणि खासदार बळवंत वानखेडे (Balwant Wankhede) यांनी भाऊबीज साजरी केली. यावेळी वानखेडे यांनी ठाकूर यांचे आभार मानत आपल्या विजयाचे श्रेय त्यांना दिले. 'ताईंनाच मला एवढं गिफ्ट दिलं की आज एक संसदेत खासदार म्हणून लोकांचा आवाज म्हणून मी मला त्यांनी संसदेत पाठवलं', असं वक्तव्य बळवंत वानखेडे यांनी केले. दिल्लीला जाण्यापूर्वी वानखेडे यांनी ठाकूर यांची भेट घेऊन भाऊबीज साजरी केली. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. 'मी तर एकही फटाका फोडला नाही आणि असा दिवाळीत फटाके फोडायचे नाही हा प्रण घेतलेला आहे, कारण शेतकरी खरंच संकटात आहे', असे ठाकूर म्हणाल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola