Climate Crisis: हवामान बदलाचा थेट परिणाम, Iceland मध्ये पहिल्यांदाच आढळले मच्छर! Special Report
Continues below advertisement
आयसलँड (Iceland) मध्ये पहिल्यांदाच मच्छर (Mosquito) आढळल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे, यामागे हवामान बदल (Climate Change) हे प्रमुख कारण मानले जात आहे. 'आयसलँडमध्ये मच्छर आढळणं ही धोक्याची घंटा मानली जातेय,' कारण यामुळे हवामान बदलाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. ऑक्टोबर २०२५ मध्ये स्थानिक कीटक अभ्यासक बियोन होल्टसन (Björn Hjaltason) यांना आपल्या बागेत एक वेगळा कीटक दिसला, जो मच्छर असल्याचे Icelandic Institute of Natural History ने सांगितले. आतापर्यंत Iceland आणि Antarctica हे दोनच प्रदेश मच्छरमुक्त होते. हवामान बदलामुळे Iceland चे तापमान वाढले आहे, ज्यामुळे बर्फ वितळत आहे आणि मच्छरांसारख्या कीटकांसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. आढळलेली प्रजाती रोग पसरवणारी नसली तरी, सरकारने भविष्यातील धोका लक्षात घेऊन पाणथळ जागांवर शोधमोहीम सुरू केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement