#Corona मार्च महिन्यात 55 हजारांहून अधिक लहान मुलांना कोरोना, महाराष्ट्रात कोरोनाचा विस्फोट
Continues below advertisement
मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. आज तब्बल 39 हजार 544 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, राज्यात खासगी प्रयोगशाळांमध्ये करण्यात येणाऱ्या कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा सुधारित करण्यात आले आहे. आता कोरोना निदानासाठी करण्यात येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीसाठी 500 रुपये आकारण्यात येणार आहे. याबरोबरच रॅपीड अँटीजेन अँटीबॉडीज तपासणीचे दर देखील कमी करण्यात आले आहेत. अँटीजेन टेस्ट 150 रुपये करण्यात येणार आहे, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केली आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाने शासन निर्णय देखील जाहीर केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Corona Corona Death Corona In Maharashtra Rajesh Tope Corona Test Lockdown Corona Maharashtra Covid Test Rajesh Tope Lockdown