CORONA third wave : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत 5 लाखांपेक्षा जास्त रुग्ण वाढू शकतात, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा अंदाज
कोरोनाची तिसरी लाट पुढील महिन्यात सप्टेंबरमध्ये येईल असा अंदाज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने वर्तविला आहे. या लाटेत ५ लाखांपेक्षा जास्त रुग्ण वाढू शकतात, असा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिला आहे. सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट शिगेला पोहोचेल आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये ती लाट कमी होत जाईल असं राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने बनविलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.