Monsoon Maharashtra : राज्यभरात अवकाळी पावसाची हजेरी; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला
ऐन दिवाळीत पावसानं राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे. रायगड, सिंधुदुर्ग, नाशिकसह अनेक ठिकाणी काल पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यांना झोडपून काढलं. या पावसामुळे भात शेती, वरी, भाजीपाला, टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी आणि डोळ्यातही पाणी असं विदारक चित्र दिसलं. सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढलं. भातकापणी सुरू असताना झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं.
Tags :
Nashik Konkan Rain Sindhudurg Rain Nashik Rain Ratnagiri Rain Nashik Irregular Rain Igatpuri Rain Trimbakeshwar Rain