Monsoon 2024 Updates : केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार, सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता
Monsoon 2024 Updates : केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार, सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता
दरवर्षी 1 जूनला केरळात दाखल होणारा नैऋत्य मोसमी मान्सून यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेतकऱयांसाठी ही आनंदवार्ता असून उकाडय़ापासूनही लवकरच सुटका होणार आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी मान्सून 4 जूनला केरळात दाखल होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात मान्सून 8 जूनला दाखल झाला होता. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. 2022 मध्ये 29 मे 2021 मध्ये 3 जून 2020 मध्ये 1 जून तर 2019 मध्ये 8 जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता.