Mohit Kamboj Mumbai : उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आलानाही, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले..

Continues below advertisement

Mohit Kamboj Mumbai : उद्धव ठाकरेंना पक्ष सांभाळता आलानाही, देवेंद्र फडणवीस पुन्हा आले..

राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आज 12 दिवस झाले. राज्यात अद्याप मुख्यमंत्री पदासाठीच्या चर्चा सुरू होत्या, आज महाराष्ट्राच्या नवीन मुख्यमंत्र्यांबाबतचा सस्पेंस बुधवारी (4 डिसेंबर 2024) अखेर संपला. मुख्यमंत्र्यांबाबतचे आत्तापर्यंत भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या चर्चा राज्यभरात सुरू होत्या, त्या चर्चा आज खऱ्या ठरल्या आणि पुन्हा एकदा महायुतीतील भारतीय जनता पक्षाने (भाजप) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. आज महायुतीच्या तिन्ही पक्षातील नेत्यांनी राज्यपालांसमोर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. उद्या (गुरूवारी) मुंबईत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. 

मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी सुरू झाली असली तरी या घोषणेनंतर एक प्रश्नही निर्माण झाला आहे त्याचबरोबर या एका प्रश्नाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणाप्रमाणे महाराष्ट्रातही भाजपने तोच फॉर्मूला का स्वीकारला नाही, हा प्रश्न आहे. इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप पक्षाने नव्या चेहऱ्याला संधी का दिली नाही? याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram