Mohan Date on Raksha Bandhan : रक्षाबंधनासाठी कोणता मुहूर्त चांगला? पंचांगकर्ते मोहन दाते Exclusive

Continues below advertisement

Astrology 15 August 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, 15 ऑगस्टपासून (Independence Day 2024) अनेक ग्रहांच्या चाली बदलत आहेत, ज्याचा परिणाम सर्व राशींवर होईल. 16 ऑगस्टला सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य हा सिंह राशीचा अधिपती ग्रह आहे, त्यामुळे सूर्याचा सिंह राशीतील प्रवेश अतिशय शुभ मानला जातो. जेव्हा सूर्य सिंह राशीत प्रवेश करतो तेव्हा काही राशीचं निद्रीस्त भाग्य देखील बदलतं. सूर्य दर महिन्याला राशी बदलतो. त्यामुळे सूर्याच्या संक्रमणामुळे 16 ऑगस्टपासून कोणत्या राशी (Zodiac Signs) सुखात जीवन जगणार? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

15 ऑगस्टपासून मेष राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यावसायिकांना व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्हाला भावा-बहिणींकडून मदत मिळू शकते. या काळात तुमचं धैर्य वाढेल. या काळात तुमच्या मान-सन्मान आणि पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. तुम्हाला जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायासाठी वेळ शुभ राहील. तुम्ही केलेल्या कामाचं कौतुक होईल. 

मिथुन रास (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ राहील. नोकरी-व्यवसायात तुमची प्रगती होईल. मान-सन्मान मिळेल. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुम्ही कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तुम्हाला नोकरीत पदोन्नती मिळू शकते. कोणतंही नवीन काम सुरू करण्यासाठी सूर्याचं भ्रमण लाभदायक ठरेल. शिक्षण क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी नाही.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांचा सुवर्णकाळ आता सुरू होईल. या काळात कौटुंबिक नात्यात गोडवा वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. तुमचा आत्मविश्वास वाढेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. पैशाशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. गुंतवणुकीतून लाभ होईल.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीसाठी हा काळ फायदेशीर ठरेल. व्यवहारासाठी ही वेळ शुभ आहे. या काळात तुमचा मान-सन्मान वाढेल. नोकरीच्या ठिकाणी लाभ होईल. पैशाची आवक होण्याच्या नवीन संधी मिळतील, उत्पन्नाचे नवे स्रोत खुले होतील. या काळात व्यावसायिकांना फायदा होऊ शकतो. हा काळ तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram