Supriya Sule Full PC Dhule : लाडक्या बहिणींचे फॉर्म चुकीचे भरले, सुप्रिया सुळेंचे आरोप
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupriya Sule : लाडकी बहिण योजनेचे (Ladki Bahin Yojana) दीड हजार रुपये नाही मिळाले तरी चालतील पण पिकांना हमीभाव (MSP) द्या, भर सभेत शेतकरी महिलेनं अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यासमोर केली आहे. देशात आणि राज्यात महागाई झाली की नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी भरसभेत केला होता. यावर बोलताना एका शेतकरी महिलेनं लाडकी बहिण योजनेचे दीड हजार नको पण शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव द्यावा, अशी मागणी केली आहे. जळगावमध्ये आयोजीत कार्यक्रमात हा प्रकार घडला.
आमच्या पिकांना दर मिळत नाही
आम्ही सोयाबीन आणि कपाशी पिकं घेतो, पण पिकांना दर मिळत नसल्याची माहिती महिला शेतकऱ्यांनी सुप्रिया सुळे यांना सांगितली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे पारोळा येथे आयोजित महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी उपस्थित महिलांना सुळे यांनी मार्गदर्शन केले. आपल्याला लवकरच विधानसभेचा गुलाल उधळायचा असल्याचेही सुळे म्हणाल्या.