Mohan Bhagwat : आपण देव असल्याची भावन काही जणांना जाणवत आहे

Continues below advertisement

Mohan Bhagwat : आपण देव असल्याची भावन काही जणांना जाणवत आहे

मी देव झालो, असे स्वत: म्हणू नये. तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या,’ अशा शब्दांत येथे आयोजित कार्यक्रमात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी गुरुवारी उपस्थितांचे ‘बौद्धिक’ घेतले. ‘क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखे कधी होऊ नये. चमकणे डोक्यात जाते. त्यामुळे वीज होऊन चमकण्यापेक्षा पणती होऊन तेवत, जळत राहावे,’ असा ‘सल्ला’ही त्यांनी दिला.

पूर्व सीमा प्रतिष्ठानच्या वतीने संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक कै. शंकर दिनकर तथा भय्याजी काणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात डाॅ. भागवत बोलत होते. प्रतिष्ठानचे सचिव जयवंत कोंडविलकर, रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव यांच्यासह बांधकाम विकासक नितीन न्याती या वेळी उपस्थित होते. संघाच्या विविध स्वयंसेवक आणि प्रचारकांनी केलेल्या देदीप्यमान कार्याचा गौरव करताना डाॅ. भागवत यांनी हा सल्ला दिला.

देवाने मला काही विशिष्ट उद्दिष्टासाठी पाठवले आहे आणि ते पूर्ण होईपर्यंत मी काम करत राहीन,’ असे विधान लोकसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत केले होते. त्या पार्श्वभूमीवर, ‘मी देव आहे, अशी भावनाही काही जणांना जाणवत आहे. मात्र, तुमच्यातील देवत्व लोकांनी ठरवावे. माझ्याबाबत कोणी असे शब्द उच्चारले, तर मी ते कानापर्यंत येऊ देतो. पण, ते मनापर्यंत पोहोचू देत नाही,’ असे भागवत यांनी म्हटल्याने त्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram