ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 06 September 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 09 AM 06 September 2024

मुंबईत शिवाजी महाराजांचा पुतळा पाच वर्षांपासून
अडगळीत, मध्य रेल्वेच्या नियम बदलामुळे पुतळा धूळ खात पडल्याची चर्चा, एबीपी माझाचा एक्स्लुझिव्ह रिपोर्ट

रामदास कदमांचा मुलगा आमदार योगेश कदमांना करावा लागणार भाऊबंदकीचा सामना, चुलतभाऊ अनिकेत कदम करणार विरोधात प्रचार..

राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण जाहिरातीवरून मंत्रिमंडळ बैठकीनंतर चर्चा...एसओपी बनवण्याची फडणवीसांची भूमिका... तर आक्षेप घेण्यासारखं काय, राष्ट्रवादीचा सवाल...

रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा तिसरा दिवस, शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्यास रविवारी राज्यभर रास्तारोको तर सोमवारी बैलगाड्यांसह समृद्धी महामार्ग रोखण्याचा इशारा

मुंबईतील कमला मिल कम्पाऊंडमधील टाइम्स टॉवरला लागलेली आग नियंत्रणात, वायर आणि एसीला आग लागल्याने धूर कायम

ठाण्यातल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्तांची पीडब्लूडी, पोलीस, वाहतूक अधिकाऱ्यांसोबत बैठक, वैतागलेल्या ठाणेकरांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केल्यावर प्रशासनाला जाग..

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram