Sachin Sawant : आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव : सचिन सावंत

Continues below advertisement

मुंबई : कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असताना भारताला जगभरातील 40 देशांकडून मदत पुरवण्यात येत आहे. केंद्रातले मोदी सरकार ती मदत केवळ भाजप शासित राज्यांना देत असून महाराष्ट्राशी भेदभाव केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलाय. या प्रकरणी राज्यातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी उत्तर द्यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

सचिन सावंत यांनी एका गुजराती वृत्तपत्रातील आलेल्या माहितीच्या हवाल्याने मोदी सरकारवर आरोप केला आहे. ते म्हणतात की, "40 देशांच्या आंतरराष्ट्रीय मदतीतही मोदी सरकार महाराष्ट्राशी भेदभाव करत आहे. प्रथम ते या मदत सामुग्रीवर बसून राहिले. वितरण सुरू केले तेव्हा महाराष्ट्र या यादीत नाही. भाजपा शासित युपी, बिहार, एमपी, हरियाणा, गुजरात इत्यादी राज्ये त्या यादीत आहेत. आता देवेंद्र फडणवीसांनी याचं उत्तर द्यावं. मोदी सरकारचा जाहीर निषेध."

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram