Special Report Modern College: कॉलेजकडून आडकाठी, इंग्लंडमधील नोकरी गेली, काय आहे प्रकरण?

Continues below advertisement
पुण्यातील मॉडर्न कॉलेज (Modern College) आणि माजी विद्यार्थी प्रेमवर्धन बिहाडे (Premvardhan Bihade) यांच्यातील वाद पेटला आहे. इंग्लंडमधील (UK) नोकरी कॉलेजच्या भूमिकेमुळे गमावल्याचा आरोप प्रेमवर्धनने केला असून, यात जातीय भेदभाव (caste discrimination) झाल्याचाही गंभीर दावा त्याने केला आहे. 'तुम्ही तर माझं पारलंय, माझी ओरिजिनल हॅरेसमेंट होतेय, तुमची नाही,' असं म्हणत प्रेमवर्धनने आपली व्यथा मांडली आहे. कंपनीला शैक्षणिक कागदपत्रांची पडताळणी करण्यास कॉलेजने नकार दिल्यामुळे नोकरी गेली, असं प्रेमवर्धनचं म्हणणं आहे. यानंतर RPI नेते सचिन खरात आणि NSUI ने हा मुद्दा उचलून धरला आहे. दुसरीकडे, कॉलेजच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे (Dr. Nivedita Ekbote) यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. प्रेमवर्धनची वर्तणूक समाधानकारक नसल्याने शिफारसपत्र दिले नाही, असे सांगत त्याने सोशल मीडियावरुन कॉलेजची मानहानी केल्याचा आरोपही प्राचार्यांनी केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola