OBC Politics:'BJP मला टार्गेट करण्यासाठी Bhujbal यांना वापरते', Vijay Wadettiwar यांचा खळबळजनक आरोप
Continues below advertisement
बीडमधील महाएल्गार सभेनंतर महाराष्ट्रातील ओबीसी राजकारण तापले असून, छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) या दोन प्रमुख नेत्यांमध्ये थेट आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. 'नागपूरमधील प्रचंड मोठी सभा पाहून भाजपवाले घाबरले आणि त्यांनी मला टार्गेट करण्यासाठी आपल्या फॅक्टरीतील एका नेत्याला, छगन भुजबळांना माझ्यावर सोडलं आहे', असा खळबळजनक दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. बीडच्या सभेत भुजबळांनी वडेट्टीवार यांचा एक जुना व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना वडेट्टीवार यांनी म्हटले की, भाजप महायुती सरकार समाजात भांडणे लावून मूळ प्रश्नांपासून लक्ष हटवत आहे. अंबडच्या सभेमध्ये 'कोयता' काढण्याची भाषा वापरली गेली, अशा सभांना कसे जाणार, असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, भुजबळांनी म्हटले आहे की वडेट्टीवार एकदा ओबीसींसोबत येतात आणि नंतर पाठ फिरवतात, हे कसे चालेल?
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement