Maha Local Body Polls: 'पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता'- Ajit Pawar

Continues below advertisement
राज्यातील मुंबई महापालिकेसह (Mumbai Municipal Corporation) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या निवडणुकांसंदर्भात मोठे संकेत दिले आहेत. 'मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी पुढील आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे,' असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. मुंबई, पुणे आणि नागपूरसह अनेक महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका गेल्या काही काळापासून रखडल्या आहेत. पवार यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. मुंबई महापालिकेसाठी (BMC) वॉर्ड आरक्षणाची सोडत ११ नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच जाहीर केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola