Ajit Pawar On karjmaafi : 'सतत किती वेळा फुकट मागणार?', Ajit Pawar यांचा शेतकऱ्यांना थेट सवाल!
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कर्जमाफीवरून (Loan Waiver) केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. बारामतीमधील एका सभेत बोलताना पवार यांनी शेतकऱ्यांवर टीकास्त्र सोडले. 'सारखंच फुटतात आणि सारखंच माफ, असं नाही चालत,' असं म्हणत अजित पवार यांनी शेतकऱ्यांना सतत कर्जमाफी मागण्याच्या सवयीवरून प्रश्न विचारला. त्यांनी स्पष्ट केले की कर्जमाफी वारंवार होणार नाही आणि ३० जून २०२६ नंतरच त्यावर विचार केला जाईल. या वक्तव्यानंतर शेतकरी नेते बच्चू कडू (Bacchu Kadu), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. बच्चू कडू यांनी, 'यांना किती दिवस फुकट निवडून द्यायचं?' असा सवाल केला, तर राजू शेट्टी यांनी, 'आम्ही काय भिकारी नाहीत,' असे म्हणत सरकारवर धोरणे बनवण्याची मागणी केली. मनोज जरांगे यांनी याला मुख्यमंत्र्यांना तोंडावर पाडण्याचा प्रकार म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement