Beed | थकीत एफआरपीच्या मुद्यावरुन पंकजा मुंडेंविरोधात मनसे आक्रमक | ABP Majha

Continues below advertisement
थकीत एफआरपीच्या मुद्यावरुन मनसेनं पंकजा मुंडेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय.. लातुर जिल्ह्यात मुंडे कुटुंबियांच्या खासगी मालकीचा पनगेश्वर साखर कारखाना आहे. कारखान्यानं शेतकऱ्यांचे तसंच ऊसतोडणी मजुरांचे पैसे थकवल्याचा मनसेनं आरोप केलाय. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी परळीतील पंकजा मुंडेंच्या घरासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. मनसे कार्यकर्ते शिवाजी चौकातून पंकजा यांच्या घराच्या दिशेनं काढलेला मोर्चा पोलिसांनी वाटेतच अडवला...यावेळी पंकजा मुंडे समर्थकही दाखल झाले आणि त्यांनी  पंकजा जिंदाबादच्या घोषणा द्यायला सुरुवात केली.. तर परवानगी विना मोर्चा काढण्यात आल्यानं पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram