MNS Prtoest On Parth Pawar: पार्थ पवारांविरोधात मनसे आक्रमक, राजीनाम्याची मागणी

Continues below advertisement
पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या विरोधात मनसे (MNS) आक्रमक झाली आहे. मुंडवा येथील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणी मनसेने (MNS) तहसील कार्यालयावर आंदोलन करत अजित पवारांच्या (Ajit Pawar) राजीनाम्याची मागणी केली. आंदोलकांचे म्हणणे आहे, 'जाणून बुजून पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करत नाहीये'. मनसेने (MNS) आंदोलनादरम्यान अजित पवार (Ajit Pawar) आणि पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी (Amadea Enterprises LLP) कंपनीने सुमारे ३०० कोटी रुपयांची जमीन घेतल्याचा आरोप आहे, आणि हा व्यवहार चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा आंदोलक करत आहेत. या प्रकरणात तहसीलदारांवर गुन्हा दाखल झाला आहे, मात्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. नैतिक जबाबदारी स्वीकारून अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी आंदोलकांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola