Bhiwandi Fire: भिवंडीत अग्नितांडव! सरवली MIDC मधील 'मंगल मूर्ती डाईंग' कंपनी जळून खाक

Continues below advertisement
भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी (Saravali MIDC) परिसरातील मंगलमूर्ती डाईंग (Mangalmurti Dyeing) कंपनीला भीषण आग लागली आहे. आगीचे रौद्र स्वरूप इतके भीषण होते की, धुराचे लोट अनेक किलोमीटर दूरवरून दिसत होते. या आगीच्या घटनेमुळे संपूर्ण कंपनी जळून खाक झाली असून मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. डाईंग कंपनी असल्याने आतमध्ये मोठ्या प्रमाणात कापडाचा साठा होता, ज्यामुळे आगीने वेगाने पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच भिवंडी आणि कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola