MNS Prakash Mahajan on Uddhav Thackeray : मातोश्रीचा एफएसआय देताना फडणवीस फुलासारखे होते..
उद्धव ठाकरेंनी देेवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टीकेचा मनसे नेते प्रकाश महाजन यांनी खरपूस समाचार घेतलाय... मातोश्री दोनचा एफएसआय क्लिअर करताना फडणवीस फुलासारखे होते.. आता ते फडतूस कसे झाले असा सवाल प्रकाश महाजन यांनी केलाय. मातश्री दोनला महापालिकेकडून एफआसआयची परवानगी मिळत नव्हती, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेषाधिकार वापरून ती परवानगी मिळवून दिली..त्यावरूनच महाजन यांनी आज ठाकरेंवर टीका केलीये.