MNS Post Ajit Pawar Video : अजित पवारांचा जुन्या भाषणाचा व्हिडीओ मनसेकडून ट्विट ABP Majha

Continues below advertisement

MNS Post Ajit Pawar Video : अजित पवारांचा जुना व्हिडीओ मनसेने बाहेर काढला ABP Majha

NCP Crisis :  मागील दोन वर्षांमध्ये महाराष्ट्राचं राजकारण (maharashtra politics) ढवळून निघालेय. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यानंतर अजित पवारांनीही (Ajit Pawar) बंड केले. पक्षावर आणि चिन्हावर दावा केला, ते त्यांना मिळालेही.  मंगळवारी निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांनं दिलं. यावरुन मनसेनं (MNS) आपल्या खास शैलीत टीकास्त्र सोडलेय. अजित पवारांवर (Ajit Pawar Video) निशाणा साधलाय. दरम्यान, त्याआधी वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं होतं. त्यावेळी विरोधीपक्षात असणाऱ्या अजित पवारांनी खणखणीत भाषण करत टीका केली होती. अजित पवारांच्या भाषणातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तोच व्हिडीओ पोस्ट करत मनसेनं निशाणा साधलाय. 

'भुजां'मध्ये कितीही 'बळ' आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे 'तट' फोडून सत्तेसाठी घातलेला हा 'वळसा' महाराष्ट्राला 'पटेल' का? अशा आशायाखाली अजित पवारांचा व्हिडीओ पोस्ट केलाय. भुजबळ, सुनील तटकरे, वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरही मनसेने निशाणा साधलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना दिल्यानंतर मनसेनं एकापाठोपाठ एक ट्वीट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram