Congress Yuti MNS: नाशिकमध्ये युती, मुंबईत फारकत? मनसे-काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय?
Continues below advertisement
मनसे (MNS) नेते अविनाश अभ्यंकर यांनी आगामी महापालिका निवडणुकांमधील पक्षाच्या भूमिकेवर भाष्य केले आहे, ज्यात नाशिक (Nashik) आणि मुंबईमधील (Mumbai) पक्षाच्या धोरणांवर चर्चा झाली. आमच्याकडून कुठलाही निर्णय घ्यायचा असेल तर तो फक्त राजसाहेब ठाकरेच घेतील, असे अभ्यंकर यांनी स्पष्ट केले. नाशिकमध्ये मनसे आणि महाविकास आघाडी (MVA) यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन स्थानिक निवडणुका सोबत लढणार असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे, काँग्रेस (Congress) नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे म्हटले आहे. यावर प्रतिक्रिया देताना अभ्यंकर म्हणाले की, काँग्रेसने स्वतंत्रपणे निर्णय घेतला आहे आणि मनसेने त्यांना कोणताही प्रस्ताव दिला नव्हता. दुबार मतदानाचा (duplicate voting) गोंधळ हा सर्वपक्षीय मुद्दा असून, त्याबद्दल मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यावर पक्षाचा भर असल्याचेही त्यांनी नमूद केले. मुंबई महापालिकेसाठी मनसेच्या 125 उमेदवारांची यादी तयार असल्याच्या वृत्तावर बोलताना, आमची तयारी नेहमीच सर्व 227 जागांसाठी असते, असे त्यांनी सांगितले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement