Voter List Cleanup: मतदार याद्यांवर मनसेची करडी नजर, दुबार मतदानावर वॉच , राज ठाकरेंचा इशारा
Continues below advertisement
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मतदार याद्यांमधील (Voter Lists) दुबार नावांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. 'निवडणुकीच्या दिवशी दुबार मतदानासाठी येणाऱ्यांना मनसेचाही स्टार मिळणार आहे', असा स्पष्ट इशारा पक्षाने दिला आहे. निवडणूक आयोग (Election Commission) संभाव्य दुबार मतदारांच्या नावापुढे 'डबल स्टार' (Double Star) चिन्ह लावणार असल्याची घोषणा केल्यानंतर मनसेनेही आपली यंत्रणा सज्ज केली आहे. मुंबईतील मतदार याद्यांच्या निरीक्षणासाठी मनसेने विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली असून, दुबार मतदान रोखण्यासाठी पक्ष जातीने लक्ष घालणार आहे. याद्यांमधील अनियमिततेविरोधात मनसेने नुकतेच आंदोलन आणि प्रदर्शनही केले होते, ज्यामुळे हा मुद्दा अधिकच चर्चेत आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement