MNS Meeting Udhhav Thackeray : उद्धव ठाकरेंसोबत जाण्याचा मनसे नेत्यांचा सूर
राज्यातील दोन दिवसांतील राजकीय घडामोडीनंतर मनसेच्या बैठकीत आज वेगळाच सूर निघाला. मनसेच्या काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देण्याचा सूर काढला. राज्यातील घडामोडी आणि लोकसभा निवडणुकीबाबत मनसेची ही बैठक होती. लोकसभेची निवडणूक कशी लढायची यावर चर्चा सुरू असताना काहींनी उद्धव ठाकरेंना साथ देण्याचा विषय काढला. यावर यावर राज ठाकरेंनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, हा विषय चर्चेला आला ही खूप मोठी घटना आहे.
Tags :
Meeting Reaction State Lok Sabha Elections MNS Uddhav Thackeray Political Affairs : Uddhav Thackeray